नांदेड(प्रतिनिधी)-सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या निवडणुकींच्या माध्यमातून अनेकांना आपले नशिब आजमावण्याची संधी सुध्दा मिळत असते.अमरावती येथील आ.रवि राणा यांच्या स्वामीमान पक्षाकडून नांदेड येथील पवन बोरा(शर्मा) यांना नांदेड दक्षीण मतदार संघातून स्वाभिमान पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पवन बोरा यांना उमेदवारी मिळालीच तर अमरावतीचे आमदार रवि राणा हे नांदेड येथे पवन बोरा यांच्या प्रचाराला सुध्दा येतील अशी एक नवीन माहिती समोर आली आहे. भारतातील कोणतीही निवडणुक लढविणे हा भारताच्या प्रत्येक नागरीकाचा अधिकार आहे. नांदेड येथे राहणारे पवन जगदीशप्रसाद बोरा(शर्मा) यांनी सुध्दा नांदेड दक्षीण या विधानसभा क्षेत्रातून निवडणुक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. जगदीशप्रसाद बोरा यांनी आपल्या जीवनात कमावलेले नावाचे वैभव निवडणुक पवन बोराच्या कामी येईल. या संदर्भाने पवन बोरा यांनी स्वाभिमान पक्षाकडून निवडणुक लढविण्याचा मानस व्यक्त केला असून त्यांनी स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अमरावती येथील आमदार रवि राणा यांच्याशी संपर्क साधला आहे. रवि राणा यांनी यास संमती दिली तर पवन बोरा ही निवडणुक स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढविणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,666 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक बैठकीला दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : निवडणूक अधिकारी निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत