नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील दोन अपर पोलीस महासंचालकांना पोलीस महासंचालक पदावर पदोन्नती देवून राज्य शासनाने त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. राज्य शासनाच्या गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने आज 10 ऑगस्ट रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आज मंत्रीमंडळाच्या मॅराथॉन निर्णयांमध्ये अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांना अपर पोलीस महासंचालक आस्थापना येथून पोलीस महासंचालक ही पदोन्नती देवून महाराष्ट्र राज्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती दिली आहे. संजीवकुमार सिंघल हे 1992 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. तसेच अपर पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ येथे कार्यरत असलेल्या अर्चना त्यागी यांना त्या मंडळावर पोलीस महासंचालक पदोन्नती दिली आहे. अर्चना त्यागी 1993 बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत.
लवकरच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या दरम्यान काही वाद उद्भवू नये म्हणून राज्य शासनाने या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदावर पदोन्नती देवून आपली जबाबदारी पुर्ण केल्याचे दाखवले आहे.
राज्यातील दोन अपर पोलीस महासंचालक झाले पोलीस महासंचालक
