नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात 35-40 वर्ष वयाच्या एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. हा व्यक्ती मुळ रा.दबडेशिरुर येथील असल्याचे सांगण्यात आले.
आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास मुखेड शहरातील बस स्टॅंडच्या पाठीमागे फुलेनगरमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडूपांमध्ये एक प्रेत दिसले. याबाबत नागरीकांनी पोलीसांना माहिती दिल्यानंतर हा व्यक्ती अशोक चावरे रा.दबडेशिरुर ता.मुखेड जि.नांदेड येथील आहे. तो मागील तिन दिवसांपासून घरातून गायब होता. त्याचा शोध सुरू होता. आज त्याचे प्रेत सापडले आहे. प्रत्यक्ष प्रेत पाहणाऱ्या लोकांनी सांगितले की, त्याच्या तोंडावर दगडाने ठेचलेले आहे. या संदर्भाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार वृत्तलिहिपर्यंत अशोक चावरे यांच्या घरी मंडळी तेथे पोहचलेली नव्हती.