नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी ओमकार पब्लिक स्कुलच्या पाठीमागे एका ठिकाणी धाड टाकून विविध प्रकारचे प्रतिबंधीत गुटखे आणि प्रतिबंधीत जर्दा जप्त केला आहे. या मुद्देमालाची किंमत 1 लाख 18 हजार 732 रुपये आहे. दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, विक्रम वाकडे, शेख असीफ, माधव माने, शंकर माळगे, ज्ञानेश्र्वर कलंदर, सुनिल गटलेवार, शिवानंद तेजबंद आदींनी कौठा भागातील ओमकार पब्लिक स्कुलच्या पाठीमागे धाड टाकली. तेथे राजनिवास, विमल पान मसाला, मुसाफिर, रजनिगंधा, सिग्निचर, बाबा 120 तंबाखू, वजिर गुटखा असा एकूण 1 लाख 18 हजार 732 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अत्यंत उत्कृष्ट पोलीस अंमलदार मारोती पचलिंग यांच्या तक्रारीवरुन किशोर प्रल्हादराव देशमुख(34) आणि अजिम अशा दोन लोकांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 274, 275 प्रमाणे गुन्हा क्रमांक 907/2024 दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी नांदेड ग्रामीण पोलीसांचे कौतुक केले आहे.