नांदेड : -आंबेडकरी चळवळीला बळकटी देण्यासाठी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्तेच्या राजकारणाच्या बेरजेसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोळसळे यांच्या पुढाकारातून आज असंख्य कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेत प्रवेश करणार आहेत.
नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो . रिपब्लिकन विचार धारेला अनुसरून गेल्या अनेक दशकापासून आंबेडकरी चळवळीला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीकडे आणि आंबेडकरी राजकारणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे नेहमीच लक्ष राहिले आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीला अपेक्षित राजकीय यश मिळाले नव्हते. आता राजकीय यशाचा पल्ला गाठण्यासाठी प्रा. राजू सोनसळे यांनी संघटनात्मक पुनर्बांधणीला हात घातला आहे . सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात अपेक्षित राजकीय यश मिळविण्याच्या अनुषंगाने उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते आणि तरुण रिपब्लिकन सेनेत प्रवेश करतील अशी माहिती ही जिल्हाध्यक्ष प्रा. सोनसळे यांनी दिली आहे.