नांदेड(प्रतिनिधी)-भोकर शहरात एका चार चाकी वाहनामध्ये बळजबरीने कोंबून कत्तल खाण्याकडे जाणाऱ्या चार गाई आणि चार कारवडी पोलीसांनी पकडल्या आहेत. तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरिक्षक लक्ष्मण व्यंकटराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.6 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्यासुमारास ते तपासणी करत असतांना सलगरा फाटा ता.मुखेड येथे त्यांनी चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.5056 ची तपासणी केली. त्यामध्ये चार गाई आणि चार कारवडे दाटीवाटीने कोंबून भरलेली होती. या पशुधनाला कत्तल खान्याकडे घेवून जात होते. भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 3(5) सोबत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना कु्ररतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा प्रमणे गुन्हा क्रमांक 302/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी सदरात अहमद युसूफ कुरेशी (27) रा.कासराळी ता.बिलोली, नयुम अजमुद्दीन कुरेशी(27) रा.बेटमोगरा ता.मुखेड आणि मोहदु अब्दुल साब कुरेशी रा.बेटमोगरा ता.मुखेड यांची नावे समावि्ट आहेत.या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.