नांदेड -सध्या मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे व पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी अफवा जनतेमध्ये पसरत आहे. या अफवेमुळे नांदेड जिल्हा तसेच शहरामधील मधील विविध पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी केल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा प्रशासन स्पष्टपणे कळविते की पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही तसेच इंधनदर वाढीचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे प्राप्त नाही. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. नांदेड जिल्ह्यात इंधन साठा सुरळीत असून पुरवठा नियमित पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे पेट्रोल/डिझेल भरण्यासाठी घाईगडबड करून गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की— 1. कोणत्याही प्रकारच्या अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये. 2. अधिकृत माहिती फक्त शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमांतूनच स्वीकारावी. 3. पेट्रोल पंपांवर शिस्त राखावी व अनावश्यक रांगा टाळाव्यात. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी भीती न बाळगता व अफवांना बळी न पडता दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवावेत. Kanthak Suryatal Post Views: 541 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात;निराधारांची आई प्रीती संतोष गर्जे यांचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची ७ मार्च रोजी कार्यशाळा