नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना दौऱ्यावर गेलेले पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांनी स्वस्त तक्रार न देता दुसऱ्याला तक्रार द्यायला लावली आणि मोठी कार्यवाही करत 17 हजार 100 रुपयांचा प्रतिबंधीत सुगंधी तंखाबु जप्त केला आहे. त्यात गुटखा होता असेही तक्रारीत लिहिले आहे.
31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्तीच नसलेले पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे, पिराजी गायकवाड आणि चालक मुंडे हे कंधार, मुखेड, जांब-जळकोट या गावांच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यामध्ये कंधार येथील खंडोबा गल्लीत राहणारे शेतकरी शंभुसिंग रामसिंग ठाकूर (35) यांच्याकडे तपासणी केली आणि दोन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये विमल-1 असे लिहिलेले, मेनकापडी, चॉकलेटी शिलवंत पॉकिटावर 30 रुपये अशी किंमत लिहिलेले पाकीट ज्याची एकूण किंमत 2 हजार 700 रुपये. तसेच दोन पांढऱ्या रंगांच्या पिशवीमध्ये चॉकलेटी रंगाचा मेनकापडी पुडा त्यावर केसरयुक्त विमल पान मसाला आतमध्ये गुटख्याचे पुडे त्यावर 160 रुपये किंमत लिहिलेले असे 90पुडे ज्याची एकूण किंमत 17 हजार 100 रुपये असा माल मिळाला अशा लिहिलेल्या तक्रारीवरुन आणि हे पदार्थ कर्करोगांसारख्या दुर्धर आजारांना निमंत्रण देतात, मानवी सेवनास व्यापक जनहितार्थ घातक असलेल्या अन्नपदार्थाचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:कडे बाळगला. याबाबत परमेश्र्वर ठाणुसिंग यांनी स्वत: तक्रार न देता स्थानिक गुन्हा शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पिराजी लालु गायकवाड यांनी शंभुसिंग ठाकूरविरुध्द तक्रार दिली आणि कंधार पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 274, 275 आणि 123 नुसार गुन्हा क्रमांक 292/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक खजे हे करीत आहेत.