नांदेड-नांदेडच्या भूमीपुत्राची यशस्वी कामगिरी भारताचे प्रतिनिधीत्व करून सुवर्ण पदक पटकाविले. चीन येथे सुरु असलेल्या एशियन स्पर्धात आर्चरी गेममध्ये भारताचे प्रतिनिधीत्व नांदेडच्या भूमीपुत्राला मिळाला.
स्वामी रामानंद विद्यापिठाकडून तो एशियन गेम मध्ये तो आर्चरि या खेळात तो सहभागी झाला होता. तेजबिर सिंह जहागीरदार याने सहा राउंड पार करत अंतिम फेरी गाठली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने शेवटचे राऊंड जिंकून भारताला गोल्ड मेडल प्राप्त करून दिले. त्याच्या यशाचे श्रेय गुरुगोविंद सिंग जी यांच्या आशीर्वादामुळे मला हे प्राप्त झाले, असे तेजबीर सिंग जहागीरदार यांनी गोल्ड मेडल भेटल्यानंतर सर्व प्रथम गुरुद्वारा येथील पुजारी संत बाबा कुलवंत सिंघ जी,बाबा बलविंदर सिंघ,बाबा राम सिंघ जी शुभेच्छा व अभिनंदन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.माझ्या आई वडील, काका काकू, माझे प्रशिक्षक या सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे मला हे यश प्राप्त करता आले. मला भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला ही माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी तसेच माझ्या सर्व नांदेड वासियांसाठी अभिमानाची बाब होती. यापुढेही अशीच यशस्वी कामगिरी करण्याचा मानस आहे. भविष्यात भारतासाठी अजूनही गोल्ड मेडल मिळवता येईल अशी कामगिरी मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. ऑलम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास मी नक्कीच भारताचे नाव लौकिक करेल अशी प्रतिक्रिया तेजबीर सिंग जाहागीरदार यांनी व्यक्त केली.