नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १० वा. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कस्तुरी निवास, यशवंतनगर विस्तारीत येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे ते पती होत. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आहे.
More Related Articles
आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ
नांदेड – मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील…
पत्रकार धनंजय सोळुंके यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.प्रमोद दुथडे फाऊंडेशन च्यावतीने नांदेड येथील मॅक्स महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे ब्युरो प्रमुख…
5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे
दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये नांदेड – नांदेड जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या…