घरफोडून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिवकल्याणनगरमधून अज्ञात चोरट्याने घरफोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असे दोन ठिकाणाहून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास आहे.
मारोती आनंदराव धोंडगे रा.शिवकल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 16 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 35 हजार व रोख 2 हजार रुपये असे एकूण 37 हजार रुपये तर दिगंबर नारायण अंकले यांच्याघरून सोन्याची एक गंठी 4 ग्रम वजनाची, 5 ग्रॅम वजनाची एक अंगठी असे 9 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 46 हजार 400, रोख 1 लाख 20 हजार रुपये असा एकूण 2 लाख 34 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 310/2024 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंाच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पाटील हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!