नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्राने विविध प्रकारच्या बेकायदेशीर दारूबाबत चार जिल्ह्यांमध्ये 179 गुन्हे दाखल केले आहेत, त्यातील आरोपींची संख्या 180 आहे. या सर्व प्रकारामध्ये 13 लाख 28 हजार 680 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार जिल्ह्यांतील 156 पोलीस अधिकारी आणि 644 पोलीस अंमलदारांनी ही सर्व कारवाई केल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीसाठी पाठविली आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचे आगमन झाल्यानंतर अवैध धंदे बंद असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे अवैध धंदे बंद करण्याचे काम सोपविले. दि. 25 ऑगस्ट रोजी एकदाच नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये हातभट्टी दारू, दारूचे रसायन, देशी दारू, विदेशी दारू, सिंदी असे अवैध धंदे करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. त्यात चार जिल्हयांमध्ये मिळून एकूण 13 लाख 28 हजार 680 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यापुर्वी 4 ते 10 ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे मोठ्या स्वरूपात छापे टाकण्यात आले होते, त्यात एकूण 411 गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांच्याकडून 26 लाख 35 हजार 958 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चारही जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्याचे समूळ उच्चांटन करण्यासाठी एकूण 17 पथके कार्यरत आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप दैनंदिन पातळीवर विशेष पथकांच्या कामगिरीचा आढावा घेत आहेत.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले की, अवैध व्यवसायांविषयी नागरिकांना माहिती असेल तर त्यांनी या बाबत संबंधीत पोलिसांना माहिती देऊन पोलिसांच्या अवैध धंदे उच्चांटनाच्या मोहिमेस हातभार लावावा.