मुदखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या रेती उपसा व वाहतुकीविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 27 जुलै रोजी रात्री मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासरी चौक आमदुरा रोडवर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित हायवा वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले. वाहनास कोणतीही वैध वाहतूक परवानगी नसल्याने पोलिसांनी हायवा व रेती असा एकूण सुमारे ₹35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 451 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कंधार उपविभागीय पोलीसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ₹48.16 लाखांचा मुद्देमाल जप्त देगलूर ग्रामीण रुग्णालयातील 89.70 लाखांच्या कथित अपहारप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा