नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 66 हजार 200 रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातील 43 हजार रुपयांचे चाहित्य चोरट्यांनी चोरले आहे.बेळगेनगर नायगाव येथे बंद घरफोडून चोरट्यांनी त्यातून 42 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.
महेश आनंदा कोलमकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 ऑगस्टच्या सकाळी 6 ते 19 ऑगस्टच्या सायंकाळी 6 वाजेदरम्यान लोहा येथील बालाजी मंदिरामागे असलेले त्यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी कुलूप तोडून फोडले. घरातील सोन्याची अंगठी, रोख रक्कम लॅपटॉप इंडक्शन शेगडी, गहु आणि तांब्याच्या मुर्त्या अशा 66 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 211/2024 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार बालाजी लाडेकर अधिक तपास करीत आहेत.
मारोती आनंदराव चिलकेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्तगिरी पेट्रॉल पंपाच्या अलिकडे त्यांचे घर आहे. 19 ऑगस्टच्या मध्यरात्रनंतर कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मेनगेटचे कुलूप तोडले आणि लॉकरमधील चांदीची गणपती मुर्ती, चांदीचा कुंकु करंडा व लहान मुलाच्या कंबरेची साखळी, पायातील वाळे व इतर सोन्या-चांदीचे दागिणे असा 43 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 355/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गवळी अधिक तपास करीत आहेत.
लक्ष्मण माधवराव लाडेकर रा.बेळगेनगर नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांच्या पत्नी 16 ऑगस्टच्या सायंकाळी 7 ते 17 ऑगस्टच्या पहाटे 7 वाजेदरम्यान बाहेरगावी गेल्या असतांना या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांच्या घराचे कुलूप तोडून, आत प्रवेश करून कपाटाच्या दरवाज्याचे लॉक तोडले आणि त्यातील 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. नायगाव पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमांक 211/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार सांगवीकर अधिक तपास करीत आहेत.