नांदेड :- एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात क्रीमिलिअर आणि वर्गीकरण करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या २१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
भारतीय संविधानाने अनुसूचित जाती, जमातीच्या घटकासाठी आरक्षणाचे सुरक्षा कवच दिली आहे . मात्र दुर्दैवाने हे आरक्षण घालवून येथे पुन्हा एकदा जातीयेता आणण्याचा आणि या घटकाला पुन्हा दुर्बल करून चातुर्यवर्णी व्यवस्था लादण्याचा डाव डाव केंद्र सरकारने आखला आहे. आरक्षणाच्या वर्गवारीत हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार न्यायालयाला नसतानाही संविधानाची पायमल्ली करत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एससी , एसटी आरक्षणात वर्गवारी करण्याच्या अनुषंगाने दिलेला निर्णय हा एसी,एसटी प्रवर्गातील जनतेची घोर निराशा आणि त्यांच्या संविधानिक अधिकारावर गदा आणणारी आहे . त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या हा निर्णय संसदेत कायदा करून बदल करण्यात यावा, तात्काळ रद्द करण्यात यावा , या प्रवर्गाचे आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी दिनांक 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नांदेडमध्ये ही बंद पुकारण्यात आला असून जनतेने हा बंद शांततेत आणि संयमाने पार पाडावा . पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही बंदला सहकार्य करावे असे आवाहन प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.