किरण पारधे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर किरण बंडू पारधे यांची निवड झाल्याचे पत्र युवा मोर्चा अध्यक्ष महानगर सरदार परमविरसिंघ मल्होत्रा यांनी जारी केले असून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते ते पत्र किरण पारधे यांना देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीमधील किरण बंडू पारधे यांचे कार्य लक्षात घेता त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंतर्गत उपाध्यक्ष पदाची नियुक्ती देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटन मजबुतीकरणासाठी शुभकामना देण्यात आल्या आहेत. किरण बंडू पारधे यांची निवड झाल्यावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!