नांदेड( प्रतिनिधी)-ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत हडको भागातील ज्ञानेश्वर नगर येथे एका युवकावर तलवारीने हल्ला करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सिंघाना ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करून माळकौठा परिसरात जेरबंद केले. सदर घटना रविवारी सकाळी घाडली.
हडको भागातील ज्ञानेश्वर नगर येथे गुडेगाव ता. नदिड येथील विशाल रावसाहेव हंबर्डे वय २२ वर्षे हा युवक रविवारी सकाळी ९.३० वा. एका ऑनलाइन सेंटरवर खात्यावर पैसे भरत होता यावेळी क्रुझर जिप या वाहणातुन तिघे येथे आले विशाल हंवर्डे व त्यांच्या मध्ये वोलण्यावरून वाचावाची झाली. यात एकाने तलवारीने विशालच्या हातावर सपा सप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आवलाने यांनी आपल्या सहकार्यासह
घटनास्थळी धाव घेतली. आरोपी एका क्रुझर वाहनातून पळुन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व माळकौठा ता. मुदखेड या भागातुन दुपारी त्याला जेरबंद केले. यात वैभव राजू हुंडे रा. हडको , संघरत्न वाघमारे रा. शाहूनगर वाघाळा, आशिष गंगाधर शिंदे रा. धणेगाव या तिघांना पोलिसांनी ताव्यात घेतले असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आवलाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग करून अवघ्या तीन तासात पकडले या प्रकरणातील क्रुझर जिप पोलिसांनी जप्त केले आहे. सदर प्रकार कोणत्या कारणामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.