नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर यांनी उल्हासनगर येथे पालक मेळावा घेतला आणि 25 मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्यासुमारास निवासी मुकबधीर विद्यालय उल्हासनगर नांदेड येथे संस्थापक मधुकर भास्करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पालक मेळावा घेण्यात आला. त्यात 25 मुकबधीर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शाम दवणे हे होते. कार्यक्रमात माजी नगरसेवक दिपक पाटील, पत्रकार नरेश तुपतेवार, के.के.पठाण, सुधाकर सरोदे, आर.आर.भास्करे, मनोहर भास्करे, दिगंबर ढोले, डॉ.इंगळे आदी उपस्थित होते.
मुकबधीर विद्यार्थ्यांना संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य व भौतिक सुविधांचे मान्यवरांनी कौतुक केले.संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सुधाकर सरोदे यांनी या प्रसंगी बोलतांना पालक, समाज तसेच शाळेतील कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणीविषय आपले मत व्यक्त केले. आर.आर.भास्करे यांनी संस्था चालकांच्या अडचणी मांडल्या.
सुसज्ज दोन मजली इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गु्रप हिअरींग एड, स्पीच ट्रेनर, शैक्षणिकसह खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या निवासाच्या वेगवेगळ्या सोयी भौतिक सुविधा पाहुन सर्व मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. ए.के.पठाण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दिगंबर ढोले यांनी इन्व्हटर स्वरुपात शाळेला देणगी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.पी.सरोदे यांनी केले, डॉ.शाम दवणे यांनी अध्यक्षीय भाषण केले.एच.डी.पडवळ यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमात बहुसंख्येने पालक व नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान भास्करे, अरुण चव्हाण, शाहु, बालाजी कंदुलवार, बाबु येरगलवार, विलास कांबळे, श्रीधर सोनतोडे यांनी परिश्रम घेतले.