पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुरुद्वारा चौकातील 300 सलाना शॉपिंग प्लाझा येथील एका दुकानात अवैधरित्या शस्त्रांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान रणजितसिंह रामसिंह सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) याच्या दुकानातून 470 तलवारी, 209 खंजर/चाकू आणि 24 फायटर पंच असा एकूण 703 अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जप्त शस्त्रांची किंमत 14,04,300 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 238/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे पोलीस अंमलदार रवी शंकर बामणे.उमर शेख,मिलिंद नारबाग,ज्ञानोबा कवठेवकर,अझरूद्दीन शेख,अनिल बिरादार,राजवंतसिंघ बुंगई,धम्मानंद जाधव,शीतल सोळंके आणि मारोती मुंढे यांनी केली.