नांदेड(प्रतिनिधी)-एक महिला आपले घर बंद करून मुलीकडे पुण्याला गेली असतांना चोरट्यांनी या संधीचा फायदा उचलत ते घरफोडत 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उज्वलनगर तरोडा(बु) येथे घडला आहे.
शकुंतला नारायण सावते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.8 जुलै रोजी त्यांनी आपले घर बंद करून, कुलूप लावून आपल्या मुलीकडे पुणे येथे गेले होते. 13 ऑगस्ट रोजी त्या परत आल्या तेंव्हा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडलेले होते. तपासणी केली तेंव्हा चोरट्यांनी 3 तोळे 5 ग्रॅमचे लॉंग गंठण किंमत 1 लाख 20 हजा रुपये किंमतीचे, 1 तोळा 5 ग्रॅमचे नेकलेस, 50 हजार रुपये किंमतीचे, 7 ग्रॅमची अंगठी 20 हजार रुपये किंमतीची आणि रोख रक्कम 20 हजार रुपये असा ऐवज कपाटातील लॉकरमधून चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305 नुसार गुन्हा क्रमांक 398/24 दाखल केला आहे. भाग्यनगरचे पोलीस उपनिरिक्षक केसगिर अधिक तपास करीत आहेत.
महिलेचे बंद घरफोडले; 2 लाख 10 हजाराचा ऐवज लंपास
