नांदेड(प्रतिनिधी)-भारतरत्न नानाजी देशमुख यांचे भाचे, शहरातील वजिराबाद हनुमान पेठ भागातील प्रतिष्ठित नागरिक व जुन्नी येथील प्रगतीशील शेतकरी अविनाशराव किशनराव देशमुख जुन्नीकर यांचे अल्पशा आजाराने दि. ६ ऑेगस्टच्या मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, भूषण उर्फ राजू, उमेश उर्फ हेमू, धनंजय ही ३ मुले, सुना,मुलगी सौ.मंजुषा, जावई डॉ.एकनाथ कुलकर्णी, नाती, नातू, नात जावई, पतवंडे, भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता गोवर्धनघाटच्या शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे वाळकीकर,कुंटुरकर,प्रवीण शर्मा यांनी श्रध्दांजली वाहिली. उपस्थितांनीही दोन मिनिटे स्तब्ध राहून अविनाश देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण केली. Kanthak Suryatal Post Views: 7,835 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्दनकाळ शहाजी उमाप असतांना जुगाराचे अड्डे जोमात सुरू मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून नांदेड जिल्ह्यासाठी 5.50 कोटीची मदत-रामहरी राऊत