नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात सत्ता 169 कुटूंबांच्या हातात आहे. पाहा खासदार, आमदार, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विविध समित्यांचे अध्यक्ष हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. एकदा नातेवाईकांची सत्ता संपली की सर्वसामान्य माणसांची सत्ता येण्यास सुरूवात होते असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकर यंानी केले.
काल दि.2 ऑगस्ट रोजी नांदेडच्या नवा मोंढा मैदानात आरक्षण बचाव यात्रेची सभा झाली. या सभेत बोलतांना ऍड.आंबेडकर म्हणाले की, तुम्हाला अर्थात सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळण्यास सुरूवात झाली की, मग तो नागरीकांच्या समस्येंवर काम करण्यासाठी तयार होतो. तो लोकांचे प्रश्न सोडवितो. जोपर्यंत सर्व ओबीसी समाज एकजुट दाखवणार नाही. तो पर्यंत यश येणार नाही. त्यासाठी येत्या 7 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप समारंभात राज्यातील सर्व ओबीसी समाजांनी एकजुट दाखवावी आणि आम्ही एकत्र लढा देणार आहोत असा संदेश द्यावा. आज गावा-गावात ओबीसी विरुध्द मराठा असे गट तयार झाले आहेत. त्या गटांमध्ये भांडणे, दंगली घडविण्याचे प्रयत्न होतील पण त्यात तुम्ही पडू नका आणि दंगलीची चितावणी देणाऱ्यांना सांगा छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा तुझ्या घरात जन्म घेवू दे अर्थात तुझ्या मुला-मुलींना पहिली दंगल घडवू दे मग आम्ही त्यांच्या पाठीशी राहु असे सांगा.
ओबीस आरक्षण आता धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रसने 225 समाजाचे आमदार आणणार अशी घोषणा केली. त्यात 56 आमदार आरक्षणाची वाढतील उर्वरीत थोडेसेच राहतात ते सर्व मिळून विधानसभेत जनगणनेची घोषणा करतील. जनगणना पुर्ण होईपर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती देतील आणि हाच मोठा खेळ ते करणार आहेत. कारण विधानसभेत झालेल्या निर्णयाविरुध्द आपण काही करू शकणार नाही. न्यायालयात सुध्दा दाद मागता येणार नाही. यासाठी मनोज जरांगे पाटलाने 288 जागा लढविण्याचा केलेला निर्धार पुर्ण करावा असे आवाहन मी त्यांना करतो. ज्या दिवशी जरांगे पाटलांनी आपली घोषणा केली त्याच वेळेस ओबीसी आणि मराठा या दोघांना न्याय मिळणारच. ही लढाई शरद पवार विरुध्द जरांगे पाटील म्हणजे श्रीमंत आणि गरीब मराठा यांच्यात आहे. म्हणून सर्वांनी गरीब मराठ्यांच्या मागे उभे राहायला हवे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एकच जालीम उपाय आहे आणि तो म्हणजे 100 ओबीसी आमदार निवडुण आणा असे ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले. या सभेत ओबीसी समाजातील अनेक समाजांचे प्रमुख उपस्थिती होते. त्यांनी सुध्दा आपले विचार व्यक्त केले.