नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवक आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा तिघांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने एक दुचाकी चोरीचा गुन्हा आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने दिलीप अशोक कांबळे(25) रा.अजणी ता.बिलोली, अविनाश बाबु भरांडे(29) रा.अजनी ता.बिलोली या दोघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. या तिघांनी वजिराबाद भागातून 20 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी चोरली होती. त्याबाबत गुन्हा क्रमांक 232/2024 दाखल आहे. याच तिघांनी रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी केली होती. त्याचा गुन्हा क्रमांक 25/2024 आहे. तसेच देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या जबरी चोरीचा गुन्हा 222/2024 आहे. या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी, रामतिर्थ येथील गुन्ह्यात 12 हजार रुपये रोख रक्कम आणि देगलूर येथील गुन्ह्यात 26 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांना पुढील तपासासाठी वजिराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या कामगिरीसाठी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, बालाजी यादगिरवाड, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, हनुमानसिंह ठाकूर, शेख कलीम यांचे कौतुक केले आहे.