अवयवदान दिनाची सामुहिक शपथ वाचन
नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी त्यांना अभिवादन केले.
आज 3 ऑगस्ट क्रांतीसिंह नाना पाटील अर्थात पत्री सरकार यांचा जन्म सोहळा दिन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस निरिक्षक शामसुंदर टाकआणि इतर अनेक अधिकारी, अनेक पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले.
3 ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान दिन आहे. या निमित्ताने पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शपथेचे सामुहिक वाचन घेतले. या कार्यक्रमात सुध्दा पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, मारोती कांबळे आणि विनोद भंडारे यांनी उत्कृष्टरित्या केले.