नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी प्रतिबंधीत असलेला गुटखा, विविध सुगंधीत तंबाखू आणि ती भरून जाणारी गाडी असा एकूण 11 लाख 65 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जबरदस्त कार्यवाही केली आहे. अर्धापूर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार आज 29 जुलै रोजी त्यांनी शिवाजी चौक मालेगाव येथे सापळा लावला. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजता एम.एच.08 ए.एन.6300 मध्ये गाडी चालक रमेश गंगाधर चेन्नै(44) रा.गणेशनगर कुरूंदा ता.वसमत हा जात होता. त्या गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात सुगंधीत पान मसाला 22 पॉकिटे किंमत 1 लाख 30 हजार 944, 12 पोत्यांमध्ये जाफराणी जर्दा किंमत 34 हजार 560 रुपये तसेच चार चाकी गाडी 10 लाख रुपये किंमतीची असा एकूण 11 लाख 65 हजार 504 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे आदींनी ही कार्यवाही करणारे अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस अंमलदार शिवराज गोणारकर, महेंद्र डांगे, अखील बेग आणि विजय कदम यांचे कौतुक केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 620 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मारेकऱ्याची ओळख पटवा 50 हजाराचे बक्षीस मिळवा जिल्हा न्यायालयाने कायम केलेली शिक्षा भोगण्यासाठी बिलोली पोलीसांनी आरोपीला पकडून तुरूंगात पाठविले