नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहर काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदावर रवि सोनसळे यांची नियुक्ती केल्याचे पत्र महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांनी दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोळे यांच्या मान्यतेनुसार नांदेड येथील महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांनी एक पत्र जारी करून नागसेननगर येथील रवि सोनसळे यांना कॉंगे्रस पक्षाच्या शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती दिली आहे. सर्व समाजाच्या व सर्व जाती-धर्माच्या जाती घटकांना सोबत घेवून तसेच पक्ष शिस्त पालन करून नांदेड शहरात कॉंगे्रस पक्षाचे संघटन मजबुत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रवि सोनसळे यांच्या पुढील कार्यासाठी वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने सुध्दा हार्दिक शुभकामना…. Kanthak Suryatal Post Views: 559 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कोणत्याहीक्षणी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील रिमझिम पावसाने विष्णुपूरी प्रकल्पाचा दरवाजा उघडला