नांदेड(प्रतिनिधी)-पौर्णिमानगर येथील ज्येष्ठ उपासिका शांताबाई पिराजीराव गायकवाड यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांची अंतिमयात्रा सायंकाळी 7 वाजता पौर्णिमानगर येथून निघेल अशी माहिती त्यांच्या निकटवृत्तीयांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात पोस्ट मास्तर म्हणून सेवानिवृत्त झालेेले पी.जी.गायकवाड यांच्या पत्नी ज्येष्ठ उपासिका शांताबाई (75) यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांची अंतिमयात्रा पौर्णिमानगर येथील त्यांच्या घरातून निघणार आहे. शांतीशाम, गोवर्धनघाट येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पती पी.जी.गायकवाड, दोन मुले रवि गायकवाड, सिध्दार्थ (बंटी) गायकवाड, मुलगी प्रज्ञा मोरे यांच्यासह सुना-जावई नातू असा मोठा परिवार आहे. आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या त्या मोठ्या वहिनी आहेत. Kanthak Suryatal Post Views: 889 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाहतुक पोलीसांना मोबाईलमध्ये वाहन चालकांचे फोटो काढता येत नाहीत बिलानगर येथे घरफोडून 1 लाख 90 हजारांची चोरी; फुलवळ शिवारातील गोडाऊनमध्ये चोरी