नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील गृहरक्षक दलात असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर केले असून 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.
नांदेड गृहरक्षक दल (होमगार्ड) जिल्हा समादेशक या पदावर नांदेडचे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार कार्यरत आहेत. नांदेड जिल्हा गृहरक्षक दलात 335 जागा रिकाम्या आहेत. त्या जागा भरून घेण्यासाठी होमगार्ड विभागाच्यावतीने ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन अबिनाशकुमार यांनी केले आहे. त्यासाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर दि.14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी नांदेडच्या पोलीस मुख्यालयातील मैदानावर या संदर्भाची नोंदणी करण्यात येणार आहे. होमगार्ड या विभागात सेवा करू इच्छिणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील रहिवाशी उमेदवारांनी अर्ज करावा असे आवाहन अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे. दिलेल्या संकेतस्थळावर होमगार्डसाठी अर्ज भरतांनाचे माहितीपत्रक आणि नियम सविस्तर स्वरुपात नमुद आहेत.
होमगार्डमध्ये सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे-अबिनाशकुमार

Omkar pawar
🙏
Sir please mujhe ye job chahiye