नांदेड(प्रतिनिधी)-रिठा ता.भोकर येथून एक 23 वर्षीय युवक गायब झाला आहे. या संदर्भाने भोकर पोलीसांनी मिसिंग प्रकरणात नोंद केली असून त्याच्या शोधासाठी शोध पत्रिकार प्रसारीत केली आहे. सुधाकर दिगंबर मोरे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांचा मुलगा ऋषीकेश सुधाकर मोरे (23) हा 30 जून रोजी रविवारी सकाळी 8 वाजता नांदेड येथे मेडिकलची नोकरी शोधण्यासाठी जातो म्हणून निघाला. त्याचा आजपर्यंत पत्ता लागला नाही. नातेवाईक व इतर मित्रांकडे शोध घेतल्यानंतर सुधाकर मोरे यांनी पोलीसांकडे अर्ज दिला. ऋषीकेश मोरेकडे मोबाईल क्रमंाक 7378377106 असा आहे. दि. 7 जुलै 2024 रोजी भोकर पोलीसांनी हा घटना क्रमांक मिसिंग क्रमांक 28/2024 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.आय.देवकांबळे यांच्याकडे देण्यात आला. या बाबत भोकर पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार ऋषीकेश सुधाकर मोरेचे वय (23) आहे. त्यांचा रंग गोरा आहे, उंची 160से.मी.आहे. त्यांचा बांधा मजबुत आहे, त्यांनी घरातून बाहेर निघतांना निळे जिन्स पॅँन्ट आणि निळे शर्ट परिध केलेले आहे, त्यांचे शिक्षक बी फॉर्मसी झालेले आहे, त्यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते, त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक 7378377106 असा आहे. पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, बातमीतील वर्णनाचा आणि छायाचित्रात दिसणारा युवक कोणाला दिसला तर त्यांनी पोलीस ठाणे भोकर दुरध्वनी क्रमांक 02467-222623 तथा सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.आय.देवकांबळे यांचा मोबाईल क्रमांक 9623979181 वर या गायब असलेल्या युवकाबद्दल माहिती द्यावी. Kanthak Suryatal Post Views: 971 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उभ्या ट्रकमधील दहा टायर पाच डिस्क चोरले मुखेडमध्ये घरे फोडून चोरी ; शहरातील श्रीनगर भागात महिलेची बॅग हिसकावली