नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरातील होळकर नगर येथे 20-21 जुलैच्या रात्री चोरट्यांनी एका पेक्षा जास्त घरेफोडून 61 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरू नेला आहे. तसेच रामदेव ज्वेलर्स श्रीनगर येथे दुपारी 12 वाजता एका पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील बॅग चोरट्यांनी बळजबरी लंपास केली आहे. त्यात 11 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. संग्राम नारायण हाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलैच्या रात्री 10 ते 21 जुलैच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे आणि त्यांच्या शेजारच्या घराचे कुलूप कडी तोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 61 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मुखेड पोलीसांनी हा घटना क्रमांक 266/2024 नुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार गोंटे अधिक तपास करीत आहेत. आयशा बेगम सलीम शेख या 21 जुलै रोजी दुपारी 12.20 वाजेच्यासुमारास रामदेव ज्वेलर्स, सोनवणे मेडीकल जवळ येथून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्यावर अडकवलेली हॅंड बॅग बळजबरीने चोरून नेली. त्यामध्ये 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल णि 500 रुपये रोख रक्कम असा ऐवज होता. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 354/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरक्षिक केजगिर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 630 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रिठा ता.भोकर येथून 23 वर्षीय युवक गायब सकल मराठा समाजाने जवळाबाजार जि.हिंगोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली