नांदेड (प्रतिनिधी)- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथील वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक व अवलंबितांमधून पदे भरावयाची आहेत. माजी सैनिक/अवलंबित उपलब्ध नसल्यास पदे नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येणार आहेत. स्वयंपाकी (महिला) या एका पदासाठी पात्रता किमान एक वर्ष अनुभव तर वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे आवश्यक आहे. अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे 25 जुलै 2024 पर्यंत दाखल करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षक यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880 व 8707608283 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 808 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – डॉ. बजाज