नांदेड,(प्रतिनिधी)-आता काही क्षणापूर्वी शहरात बऱ्याच भागात भूकंपाचे धक्के जाणवले प्रशासन स्तरावर या घटनेला दुजोरा मिळाला नाही. तरी घाबरण्याचे काही कारण नाही अशी विनंती वास्तव न्यूज लाईव्ह तर्फे करण्यात येत आहे. आज सकाळी 7. 20 वाजेच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले त्यात विवेक नगर,शिवाजीनगर, वजीराबाद,जुने नांदेड अशा भागांचा समावेश आहे. भूकंपाचे धक्के अत्यंत सौम्य होते त्यामुळे कुठूनही नुकसान झाल्याची माहिती आली नाही. सोबतच प्रशासनस्तरावर सुद्धा कोणी दुजोरा दिलेला नाही. परंतु भूकंपाचे धक्के या पद्धतीने जाणवले, त्यात सौम्यता होती म्हणून घाबरून न जाता भूकंपासाठी आवश्यक असलेल्या दक्षता घेऊन वावरावे अशी विनंती वास्तव न्यूज लाईव्ह तर्फे करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,481 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्दनकाळ पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्रात भूकंपाची तीव्रता 4.7