नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि. 8 जुलै रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले असून काही रस्ते पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशांसाठी तयार करण्यात आले आहेत. जनतेने उद्याच्या प्रवास मार्गातील बदल लक्षात घेवून करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.
उद्या दि.8 जुल रोजी मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण जनजागृती रॅली काढली जाणार आहे. ही रॅली राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार असून तेथे मनोज जरांगे पाटील हे या रॅलीस संबोधीत करणार आहेत. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नांदेड शहरात येणाऱ्या विविध मार्गातून अनेक वाहने येण्याची शक्तया आहे. त्यानुसार दि.8 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान काही वाहतुक मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि त्या मार्गांवरील वाहतुकीला वहण देऊन पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग
तरोडा नाका-शिवमंदिरकडून राजकॉर्नर ते वजिराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे येणारी वाहतुक ाण आणि येणे या दोन्हीसाठी बंद राहिल. राज कॉर्नर ते वर्कशॉप टी पॉईंट ते आयटीआय व वजिराबादचौक पर्यंत वाहतुक जाण्या-येण्यासाठी बंद राहिल. भाग्यनगर चौक येथून वर्कशॉपकडे येणारी वाहतुक बंद राहिल. महात्मा गांधी पुतळा-सोनु कॉर्नर ते वजिराबाद चौक-कलामंदिर-शिवाजीनगर ते आयटीआय चौक ते राजकॉर्नरपर्यंतची वाहतुक जाण्या-येण्यासाठी बंद राहिल. रविनगर कौठा-गोवर्धनघाट पुल येथून वजिराबाद चौकाकडे येवून राजकॉर्नरकडे वाहतुक जाण्या-येण्यासाठी बंद राहिल. रेल्वे स्टेशन ते शिवाजी महाराज पुतळा येथे येणारी वाहतुक बंद राहिल. महाविर चौक-गांधी पुतळा-शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारी वाहतुक जाण्या-येण्यासाठी बंद राहिल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
बर्की चौककडून वजिराबाद चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीने -महाविर चौक-चिखलवाडी चौक-हिंगोली गेट रस्त्याचा वापर करावा. गोवर्धनघाट पुलावरून येणारी वाहतुक वजिराबाद चौक-शिवाजीनगर-आयटीआय-वर्कशॉपकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-खडकपुरा-लालवाडी अंडरब्रिज-शिवाजीनगर-पिवळी गिरणी-गणेशनगर वाय पॉईंट जाण्या येण्याकरीता वापरता येईल. राजकॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक चैतन्यनगर-पिरबुऱ्हाण-भाग्यनगर-आनंदनगर-नागार्जुना टी पॉईंट-लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा-यात्री निवास पोलीस चौकी-अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्याकरीता वापरता येईल. सिडको-हडकोकडून येणारी वाहतुक रविनगर कौठा-गोवर्धनघाट पुल तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय-खडकपुरा-लालवाडी अंडरब्रिज मार्गे शिवाजीनगर-पिपळीगिरणी-गणेशनगर वाय पॉईंट या मार्गाचा जाण्या-येण्याकरीता वापर करता येईल.
दि.8 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे मार्ग कसे बंद आहेत आणि कसे पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. यानुसारच जनतेने आपला प्रवास नियोजित करावा. जेणे करून त्यांच्या प्रवासात अडथळा येणार नाही आणि अनेक जागी पोलीसांनी बंद केलेले मार्ग पाहुन वाद होणार नाहीत. तेंव्हा जनतेने या सुचनेकडे गांभीर्याने पाहावे असे आवाहन पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.