पायी चालणाऱ्या महिलेचे गंठण तोडले; कुलूप न लावलेल्या घरात चोरी

नांदेड,(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातून 1 लाख 6 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोतटे पळाल्याचा प्रकार घडला आहे. दुसऱ्या एका घटनेत घरास कुलूप न लावलेले पाहुन त्यातून 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबला आहे.
सौ.शारदा शिवानंद निटुरे या 6 जूनच्या सायंकाळी 5.15 वाजता साई मंदिरजवळ चैतन्यनगर येथून आपल्या घराकडे पायी जात असतांना 2 मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे शॉर्ट गंठण, पट्टी गंठण, मंगळसुत्र 32 ग्रॅम वजनाचे 1 लाख 6 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरुन नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा घटना क्रमांक भारतीय न्याय संहिता-2023 मधील कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 291/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख हे करीत आहेत.
मोहम्मद अलीम जमील अहेमद यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता ते आपल्या घराला कुलूप न लावता बाहेर गेले. 6 जूनच्या दुपारी 12.30 वाजता परत आले असता त्यांच्या घरातून सोन्या-चांदी दागिणे 54 हजार 500 रुपये किंमतीचे आणि एक मोबाईल फोन 3 हजार रुपये किंमतीचा असा 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी हा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(ए) नुसार गुन्हा क्रमांक 239/2024 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *