नांदेड(प्रतिनिधी)-एका 35 वर्षीय युवकाला नदीकाठी लिंगायत स्मशानभुमीसमोर मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. परंतू या प्रकरणातील मारेकरी मात्र अज्ञात आहेत. तसेच मारहाण करण्याचे कारण सुध्दा अज्ञात आहे.
संगीता गणेश भालेराव या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 जून रोजी पहाटे 5.30 वाजेच्या पुर्वीच्या वेळेस त्यांचा भाऊ संतोष गोपाळ कांबळे (35) रा.दिग्रस (खु) ता.कंधार हा उर्वशीघाटाकडे गेला होता. पहाटे 5 वाजेच्यासुमारास उर्वशी चौकातून लिंगात स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याच्या डंकीन भागात संतोष गोपाळ कांबळे यांचे प्रेत सापडले. संतोष कांबळेच्या दोन्ही पिंडऱ्यांवर, पाठीत, पोटात धार-धार शस्त्राने घाव केल्याचे दिसत होते. सुरूवातीला त्याला उपचारासाठी पाठविले. पण उपचारादरम्यान संतोष कांबळेचा मृत्यू झाला आहे. अर्थात हा जिवघेणा हल्याचा गुन्हा आता खूनात बदलला आहे.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी सुरूवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 326, 324 नुसार गुन्हा क्रमांक 266/2024 दाखल केला आहे. आता या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 302 वाढेल. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत.