किनवट बोधडी रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू; ट्रक जळून खाक

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट-बोधडी रस्त्यावरील धानोरा गावाच्या घाटाजवळ एका ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातानंतर लागलेल्या आगीत ट्रक जळून गेला आहे.
आज 9 जून रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.6198 हा जलधाराकडून किनवटकडे जात होता. आणि बोधडीकडून एक दुचाकी येत होती. त्या दुचाकीवर माधव कारलेवाड (42) आणि शिवाजी तिनलवाड (55) हे दोघे जलधाराकडे जात होते. जंगल आणि घाटाच्या रस्त्यात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू जागीच झाला आणि दुसऱ्या जखमीला उपचारासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. मयत दोघे पेंदा या गावचे रहिवासी आहेत. झालेली धडक एवढी जोरदार होती की, अपघातानंतर दुचाकी ट्रकमध्ये अडकली आणि त्यामुळे ट्रकने पेट घेतला. ट्रक सुध्दा जवळपास भस्मच झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *