महापालिका जबाबदारीसाठी हात झटकते

नांदेड (प्रतिनिधि)-शहरातील डॉ. आंबेडकर नगर मधील मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे. पण त्याचे काम अर्धवट सोडून नागरिकांना त्रास देण्याचा नवीन धंदा महानगरपालिकेने सुरू केला आहे. याबद्दल विचारणा केली असता ते आमचे काम नाही असे म्हणून महानगरपालिका हात झटकते आहे.

शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे मुख्य रस्ता मागील तीन ते चार दिवसांपासून मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे.या बाबत महापालिकेतील शिवाजीनगर येथील व्यवस्थापक तारू यांना विचारणा केली असता ते सांगतात की ती आमची कामे नाही ते बांधकाम विभागाचे काम आहे.आम्ही फक्त पाणी पास करतो अशा तऱ्हेची उडवा उडवीची उत्तरे व्यवस्थापक तारू यांच्याकडून देण्यात येत आहेत. तारू यांच्या सांगण्यावरून जर महापालिकेचे काम नालीतील पाणी पास करणे आहे. तर नालीचे बांधकाम कोणाच्या सांगण्यावरून तोडण्यात आले हाही प्रश्न निर्माण होतो.

सदरील नाला खोदकाम करत असताना तेथील स्थानिक लोकांनी सदरील मजुरांना ब्रेकर मशीन, घन, सबल हे सर्व साहित्य स्वतःच्या पैशातून आणून दिले मग प्रश्न निर्माण होतो की महापालिकेतील साहित्य कोणी विकून खाल्ले का ? सदरील नालीच्या कामामुळे अनेक लोक या नालीमध्ये पडून गंभीर दुखापत झाले आहेत.वयो वृद्ध लोकांना येण्या-जाण्यात खूप अडचणी निर्माण होत आहे. अशा यावेळी महापालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. डॉ. आंबेडकर नगर मधील लहान लहान मुले शाळेत जात असताना सुद्धा त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. पण अशा या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेचे कर्तव्य नाही का ती सदरील मुख्य रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.

oplus_0
oplus_0
oplus_0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!