नांदेड(प्रतिनिधी)-महावितरण कंपनीचे लाईनमनच ग्राहकांकडून कोटेशनचे पैसे घेतात आणि त्यांना थेट अकोडा टाकून वीज पुरवठा करतात अशी तक्रार अर्धापूरच्या एका नागरीकाने उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी अर्धापूर यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे हा अर्ज 30 मे रोजी देण्यात आला आहे. तरी अद्याप महाविरणने कोणतीच कार्यवाही केली नसल्याची माहिती अर्जदार सय्यद मंजुरअली यांनी दिली आहे.
अर्धापूर येथील नागरीक सय्यद मंजुरअली खुरशीद अली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अर्धापूरच्या वार्ड क्रमांक 13 मध्ये कोटेशन फाडून डायरेक्ट वीज कनेक्शन अर्थात अकोडा लावून वीज कनेक्शन दिले जात असल्याची तक्रार सय्यद मंजुरअली यांनी केली आहे. महावितरण कार्यालयाचे काही लाईनमन वार्ड क्रमांक 13, करीम कॉलनी भागामध्ये कोटेशन फाडून डायरेक्ट वीज कनेक्शन अर्थात अकोडा लावून वीज कनेक्शन देत आहेत असा आरोप आहे. हा प्रकार गेल्या चार महिन्यापासून चालू आहे. ग्राहकांकडून कोटेशनचे पैसे घेवून डायरेक्ट कनेक्शन देवून लाईटची विक्री करून शासनाची पण फसवणूक करीत आहेत. यामुळे शासनाला येणाऱ्या महसुलामध्ये कमतरता झाली असून वीज वितरण कंपनीचे लाईनमन शासकीय पैशांचा अपहार करत आहेत. या संबंधीत लाईनमन विरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी या अर्जात केलेली आहे. हा अर्ज 30 मे 2024 रोजी देण्यात आलेला आहे. पण अद्याप तरी अर्थात आज 8 जूनपर्यंत तरी या प्रकारावर काही कार्यवाही झालेली नाही अशी माहिती सय्यद मंजुर अली सय्यद खुरशीद अली यांनी वास्तव न्युज लाईव्हला दिली आहे.