20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात 20-25 वर्ष वयाच्या महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. घटना गंभीर आहे.त्यासाठी माहुर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा या घटनास्थळी भेट दिली आहे.
आज वैशाख आमावस्येचा सुर्योदय होताच माहुर तालुक्यात खळबळ माजली. माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात एका जागी जळालेल्या अवस्थेतील महिलेचे प्रेत सापडले. घटनेची माहिती मिळताच माहुर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे घटनास्थळी गेले. तेथे पाहिलेल्या परिस्थितीनुसार त्यांनी सर्व प्रथम या संबंधाने आकस्मात मृत्यू दाखल केला आहे. दिसणाऱ्या परिस्थितीनुसार त्या अनोळखी मयत महिलेचा गळा चिरल्याचे दिसत आहे. याबाबीला पोस्टमार्टम झाल्यावर दुजोरा मिळेल.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, माहुरचे पोलीस उपअधिक्षक मळघने यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या प्रकरणाच्या तपासासंदर्भाने माहुर पोलीसांना सुचना दिल्या.
माहुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणी 20-25 वर्ष वयाची महिला गायब असल्याबद्दलची माहिती असेल तर किंवा या अनोळखी मयत महिलेच्या मृत्यू घटनेबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती माहुर पोलीसांना द्यावी. शिवप्रसाद मुळे यांचा मोबाईल क्रमांक 9923178909 यावर सुध्दा माहिती देता येईल. या अनोळखी मयत महिलेच्या हातात हिरव्या बांगड्या आणि पिवळ्या धातुच्या पाटल्या आहेत. तसेच तिच्या पायात जोडवे आहेत. जनतेने या संदर्भाने मयत अनोळखी महिलेची ओळख पटावी या संदर्भाने पोलीसांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

One thought on “20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *