13014 वाहनधारकांना ठोठावण्यात आला 1 कोटी 40 लाख रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-13014वाहन धारकांनी वाहतुक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना 1 कोटी 39 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नांदेड शहर वाहतुक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.
वाहतुक शाखा वजिराबाद यांनी शहरातील लोकसभा निवडणुक 2024 दरम्यान, शहरात निवडणुकीच्या दरम्यान आलेले विविध अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या प्रचार सभा दरम्यान, रमजान ईद, प्रभु श्री रामनवनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती या महत्वांच्या सणादरम्यान दि.12 मार्च 2024 ते 5 जून 2024 या कालावधीत वाहतुक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर 13014 केसेस करण्यात आल्या. त्या सर्वांना 1 कोटी 39 लाख 82 हजार 400 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी 3343 वाहन धारकांनी 18 लाख 45 हजार 950 रुपये दंड शासनाकडे भरणा केला आहे.
नांदेड वाहतुक शाखेने जनतेला आवाहन केले आहे. वाहतुक नियमावलींचे काटेकोर पालन करा ज्यामुळे तुमचाच प्रवास सुखकर होईल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांविरुध्द काठोर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही वाहतुक शाखेने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *