नांदेड(प्रतिनिधी) -राज्यात 5994 धरणांमध्ये आज मागील वर्षीच्या 6 जूनच्या तुलनेत उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम आहे असे म्हणावे लागेल. अद्याप मान्सुनचा पाऊस सुरू झालेला नाही. राज्यात उपयुक्त पाणी साठा कमी संख्येत आहे. म्हणून मान्सुन पावसाने लवकर यावे अशीच अपेक्षा आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याची तुलनात्मक स्थिती 6 जून 2024 रोजी जारी केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण 138 मोठे प्रकल्प आहेत. त्यात आजच्या परिस्थितीत उपयुक्त पाणी साठा 17.79 टक्के आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा 25.96 टक्के होता. राज्यात 260 मध्यम प्रकल्प आहेत. त्यामधील 6 जूनचा उपयुक्त पाणी साठा 31.29 टक्के आहे. तर मागील वर्षी हा साठा 43.36 टक्के होता. राज्यात 2599 लघु प्रकल्प आहेत. यामध्ये उपयुक्त पाणी साठा 6 जून रोजी 24.73 टक्के आहे. मागील वर्षी हा साठा 32.60 टक्के होता. तसेच राज्यात सर्व धरणे आणि प्रकल्प मिळून त्यांची संख्या 2997 आहे. त्यात 6 जून रोजी उपयुक्त पाणी साठा 20.64 टक्के आहे. तसेच मागील वर्षी हाच पाणी साठा 29.22 टक्के होता.
राज्यातच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेने कमतरता
