हस्सापूर येथे पुण्यश्लोक, राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे हस्सापूर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यश्लोक, राजमाता आहित्यादेवी होळकर यांचा 299 वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांची सामुहिक आरती करण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार, पुण्यश्लोक आहित्यादेवी होळकर यांचा विजय असो, बाळु मामाच्या नावाच चांग भल अशा घोषणा देवून जय जयकार करण्यात आला. पुण्यश्लोक आहित्यादेवी होळकर यांचे कार्य उपस्थितांसमोर मांडण्यात आले. आहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी विचार आजही कसे लागू पडतात याबद्दल माहिती देण्यात आली. पुण्यश्लोक आहित्यादेवी यांच्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था तयार होती. त्यांनी राज्यात पायाभुत सुविधा निर्माण करण्याबद्दल हुंडा बंदी, मद्यबंदी बाबत जनजागृतीची काम केल होत. देशभरातील विविध मंदिरांचा जिर्णोदार करणाऱ्या आहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी काम केले.

जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व महिला मंडळ व युवकांनी गावकरी मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे तालुका संघटक ग्रा.पं.सदस्य नवनाथ काकडे यांनी करत गावकऱ्यांना, नवयुवकांना महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित सुदामराव काकडे ,विठ्ठल काकडे, मारोती काकडे ,पांडुरंग काकडे, माधव सोनटक्के ,संतोष सोनटक्के,

प्रकाश काकडे, रामेश्वर काकडे, सुरज काकडे ,मनोज काकडे, कैलास पावडे, गोविंद काकडे, गोरखनाथ काकडे, ज्ञानेश्वर काकडे, यांच्यासहित गावातील सर्व महिला मंडळ गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *