नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात दोन महिलांनी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी चोरली आहे. याबाबत फिर्यादीने दोन महिलांवर संशय सुध्दा व्यक्त केला आहे. अन्नपुर्णा विरभद्र पाटील रा.कोटग्याळ ता.बिलोली यांनी पोलीस ठाणे कुंडलवाडी येथे दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेदरम्यान दोन महिलांनी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या शयन कक्षात खुंटीला अडकवून ठेवलेली सोन्याची साखळी किंमत 60 हजार रुपये चोरली आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 45/2024 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक मस्के यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 700 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उद्याचा प्रवास बंद मार्ग पाहुन करा हस्सापूर येथे पुण्यश्लोक, राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा