नांदेड :- 16 नांदेड लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी उद्या 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार आहे. यासाठी ८९-नायगाव, ९०-देगलूर, ९१-मुखेड या मतदारसंघासाठी समीरकुमार ओ.जे. हे नांदेड मध्ये दाखल झाले आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी असणारे समीर कुमार यांनी दाखल होताच आज मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. यावेळी त्याच्यासोबत जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, अन्य निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र यांची उपस्थिती होती. शशांक मिश्र हे भोकर, नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या विधानसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून काम बघतील तर समीर कुमार ओ. जे. हे नायगाव, देगलूर, मुखेड या विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून काम करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 946 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हस्सापूर येथे पुण्यश्लोक, राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव साजरा भारतीय जनता पार्टीला कुबड्यांशिवाय सरकार बनविणे अशक्य