नांदेड(प्रतिनिधी)-मिलतनगर देगलूर नाका भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच राजकॉर्नर ते चैतन्यनगर जाणाऱ्या रस्त्यावर वामनराव पावडे पेट्रोल पंपाजवळ जळवपास 18 जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या गळ्यातील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे चैन बळजबरीने चोरून नेली आहे.
सय्यद जावेद सय्यद अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 मे च्या रात्री 10 ते 1 जूनच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराच्या सुरक्षा भिंतीवरून वर जावून छताचा दरवाजा तोडून शयन कक्षातील कपाटत ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये सोन्याचे दागिणे आणि 15 हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 492/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
वामनराव पेट्रोल पंपाचे मालक दिनेश गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 मे रोजी रात्री 9 वाजता तीन नावासह दहा ते पंधरा जण तेथे आले आणि त्यांना व त्यांच्या भावाला शिवीगाळ करू लागले. याचे कारण विचारले असता तुम्ही जातीवाद करता काय असे म्हणून त्यांना स्टिल पाईपने मारहाण केली, इतर मंडळी सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली. या गर्दीत एकाने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 226/2024 नुसार दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण हे करीत आहेत.