नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी परवानगी नसतांना कापुस बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या कंपनीसह एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सचिन किशनराव कपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे च्या दुपारी 12 वाजेदरम्यान नवीन मोंढा येथे एका दुचाकी गाडीवर मिथुन देवा चव्हाण(29) रा.भटसांगवी ता.जि.हिंगोली ह.मु.वृदांवन कॉलनी, माऊली निवास मालेगाव रोड हा आपल्या ताब्यात मे.केमिसाईड्स क्रॉप प्रोटेक्शन बेलारी कनार्टक यांचा प्रतिनिधी नसतांना आणि त्या कंपनीला कापुस विक्री करण्याची परवानगी नसतांना तो कापुस बियाणे विक्रीसाठी घेवून जात होता. त्याच्याकडे सापडलेल्या कापुस बियाण्या बॅगची किंमत 51 हजार 800 रुपये आहे. पोलीसांनी मिथुन देवा चव्हाणसह संबंधीत कंपनीचे मालक व संचालक यांच्या विरुध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियम, बियाणे नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा क्रमांक 187/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक तुरनर अधिक तपास करीत आहेत.

मिथुन देवा चव्हाण पकडून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला पोलीस कोठडीत द्यावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली जेणेकरून अशा बनावट प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना विक्री होऊन त्यांची फसवणूक होणार नाही. कायद्याच्या चौकटीत अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणींच्या अनुषंगाने न्यायालयाने मिथुन चव्हाणला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. अर्थातच सध्याच्या पेरणी हंगामात शेतकऱ्यांची अशीच फसवणूक होत राहील असेच दिसते.