नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांना अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव दिन आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्यभान कागणे, मारोती कांबळे, विनोद भंडारे आदींनी केले. Kanthak Suryatal Post Views: 847 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation विमानतळ पोलीसांनी 12 चोरीच्या मोटारी पकडल्या पोलीस दलात केलेल्या सेवेची खरी पावती सेवानिवृत्तीनंतरच मिळते-अबिनाशकुमार