जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

  • जनजागृती रॅलीस हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ

 

नांदेड –  ३१ मे हा दिवस “जागतिक तंबाखू नकार दिन” म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांची लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनिष दागडीया यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅली दरम्यान तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबतचे पोस्टर्स, चित्रफीती यांच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती करण्यात आली. तसेच तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.

 

या रॅलीसाठी जिल्हा रुग्णालयातील अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी   डॉ. हनुमंत पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.के. साखरे, डेंटल सर्जन डॉ. साईप्रसाद शिंदे, डेंटल सर्जन डॉ. अर्चना तिवारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. उमेश मुंडे व तसेच इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष डॉ. मनिष दागदिया व इतर पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, श्री गुरुगोविंद सिंघाजी स्मारक शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व सर्व विध्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, समुपदेशक नागेश अटकोरे व सुनील तोटेवाड, सुनील खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *