जलसंपदा विभागात 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुभाष काशिदे सेवानिवृत्त

नांदेड(प्रतिनिधि) – जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी मंडळात तब्बल 42 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सुभाष संभाजी काशिदे आज दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले.

या 42 वर्षाच्या कालावधीत मदतनीस या पदावर त्यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, आखाडा बाळापूर, देगलूर, नांदेड आदी ठिकाणी सेवा बाजावली. सेवानिवृत्ती निमित्त जलसंपदा विभागाच्या कार्यालयात छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. उप अभियंता एस.एच. गेडेवाड यांच्या उपस्थितीत सुभाष काशिदे यांना सेवानिवृत्ती निरोप देण्यात आला. यावेळी वरिष्ठ लिपिक दतराव मस्के, सुधाकर गरुड, शिवाजी वाघमारे, शेख अनवर, शेख अजीज, कैलास आठवले, मनोज भालेराव, रोहिदास ढगे, शेख शादुल, लखन हनुमंते, पत्रकार प्रल्हाद लोहेकर, सुरेश आंबटवार, दीपंकर बावस्कर, प्रशांत गवळी यांच्यासह सुभाष काशिदे यांच्या कुटुंबातील सदस्य स्टेशन प्रबंधक दीपक काशिदे, पत्रकार सुरेश काशिदे, रवी काशिदे, सुरज पाईकराव, संभव काशिदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *