लोकसभा निवडणुकीत काम करतांना माझा निवडणुक प्रक्रियावर मजबुत प्रक्रिया असा विश्र्वास झाला-अबिनाशकुमार

नांदेड- माझ्या पोलीस सेवेतील पहिल्या लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त करतांना मला मिळालेला प्रकाश आणि त्याचा मी केलेला वापर यामुळे माझा भारतीय लोकशाहीच्या निवडणुक पध्दतीवरील विश्र्वास दृढ झाला आहे अशा शब्दात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आपल्या पोलीस सेवेतील पहिल्या लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त अंमलात आणतांना मला समजले आहे. या निवडणुकीच्या 45 दिवसांमध्ये मी केलेले काम मी जेंव्हा पुन्हा एकदा आठवतो तेंव्हा मला मनस्वी आनंद होतो असे अबिनाशकुमार म्हणाले.
पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर मी अपर पोलीस अधिक्षक या पदापर्यंत पोहचलो. त्या दरम्यान प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक असतांना विधानसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्यावेळेस जबाबदारीची जाणिव तेवढी झाली नव्हती. माझ्या जिवनात आता काम करत असतांना नांदेड जिल्ह्यातील 19 पोलीस ठाण्यांचा प्रभार आहे. विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर आणि पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिलेल्या प्रकाशात मी हे काम केले. हे काम करत असतांना पुस्तकांची आदर्श प्रणाली मी वाचलेलीच होती. पुस्तके तशी गप्प असतात परंतू त्यांना वाचणाऱ्याला ती पुस्तके बोलायला आणि लढायला शिकवतात. त्याप्रमाणे मी काम करत राहिलो. सर्वात महत्वाचा प्रश्न ईव्हीएम वाटपापासून सुरू होतो. त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर किती पोलीस मनुष्यबळ नेमायचे हे ठरते. त्यानंतर सेक्टर पेट्रोलिंग, महसुल पथक, धावते पथक या सर्वांचे नियोजन करणे एक दुसऱ्यामध्ये समन्वय राखणे हा सर्वात मोठा जबाबदारीचा भाग होता. नांदेड जिल्ह्यात एक पोलीस अधिक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधिक्षक, बारा पोलीस उपअधिक्षक 245 अधिकारी, 4 हजार 272 पोलीस अंमलदार 2 हजार 500 गृहरक्षक दलाचे जवान तसेच सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या 6 कंपन्या पोलीस दलात कार्यरत होत्या. केरळ, आंध्र प्रदेश येथून आम्हाला मदत करण्यासाठी आलेल्या पोलीस अंमलदारांना संवाद साधणे, त्यांच्याशी योग्य काम करवून घेणे यात कसोटी होती. ज्याप्रमाणे कैचीने वृक्ष कापले जात नाहीत, कुऱ्हाडीने केस कापले जात नाहीत माणसांचे पण असेच काही आहे. त्यामुळे कोणाचीच तुलना कोणासोबत होवू शकत नाही. या वाकप्रचाराला लक्षात ठेवून ज्यांची भाषा ही आपल्याला कळत नाही आणि आपली भाषा त्यांना कळत नाही त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत दुभाषकाचे काम करवून घेतले आणि अशा सर्व मंडळींना एकाच जागी काम करावे लागेल अशी सोय केली. ज्यामुळे त्यांना इकडे-तिकडे जाण्याची गरज पडू नये. माझ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय पाहणे हे सुध्दा एक दिव्य आहे. त्यांचे प्रत्येक मतदान केंद्रावर हजर राहणे याची तपासणी केली असतांना एका ठिकाणी चार मतदान केंद्र असतील तर त्यातील माझे दोन पोलीस अंमलदार मी तपासणी केली तेंव्हा मतदानाच्या पहिल्या रात्री ते हजर सापडले नाहीत. त्यांच्याबद्दल मी पत्र व्यवहार केला आहे.
माझ्या कार्यक्षेत्रातील रामतिर्थ येथे एक ईव्हीएम मशीन फोडले गेेले आणि उस्माननगर येथे मराठा आरक्षण आंदोलकांनी गोंधळ घातला होता. या दोन घटनांशिवाय काही चुकीचे घडले नाही. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला दिलेल्या पाठबळानंतर मी स्वत:मध्ये तुम्हाला वाटत असेल की मी हे करू शकतो तर तुम्ही ते नक्कीच करू शकता.हा भाव तयार केला आणि रामतिर्थ आणि उस्माननगर येथे घडलेले निवडणुकीसंदर्भाचे दुर्देवी प्रकार मी तेथेच मिटवून टाकले. निवडणुकीच्या दिवशी मी जवळपास 40 मतदान केंद्रावर गेलो. अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अनेक नागरीक यांच्याशी बोललो आणि मतदान प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय समस्या आहेत याची जाणिव करून घेतली आणि त्यांना योग्य काय आहे, तुम्हाला काय मिळेल हे समजून सांगितले. मतदान केेंद्रांवर का करणाऱ्या माझ्या पोलीसांशी झालेल्या चर्चेत एकाच मतदान केंद्रावर उन्हामुळे होत असलेली समस्या सोडवितांना मी स्थानिक प्रशासकीय व्यक्तींशी संपर्क साधून ती अडचणी दुर करायला लावली. माझ्या पहिल्या अनुभावाप्रमाणे मतदान केंद्रावर ईव्हीएम घेवून जाणे, ते ईव्हीएम परत स्ट्रॉंग रुमला आणणे या सर्व प्रक्रियेला माझा पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गस्ती पथक आहेच. त्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद देणे महत्वपुर्ण आहे.
निवडणुकीच्या कालखंडामध्ये दररोज वेगवेगळे अनेक अहवाल निवडणुक आयोगाला पाठवायचे असतात. निवडणुक आयोग फक्त आमच्याकडूनच अहवाल मागवत नाही तर महसुल विभागाकडून सुध्दा मागवतो. या दोन अहवालामध्ये काही त्रुटी राहिली तर ती त्रुटी निवडणुक आयोग खुप गांभीर्याने घेते आणि मग त्याचा परिणाम पोलीस विभागावर होतो असा एक नवीन शिकवणुकीचा भाग माझ्या लक्षात आला. या त्रुटींना सांभाळण्यासाठी मी स्वत: मध्ये, आम्ही सर्व काही जाणतो आहोत तरी पण नवीन शिकायचे असेल तर हे स्विकारणे आवश्यक आहे की, प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आमच्यापेक्षा जास्त सक्षम असतो. या शब्दांप्रमाणे बदल करून घेतला आणि त्या त्रुटी येणार नाहीत यासाठी दक्षता घेतली आणि नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलाकडून अहवाल पाठवितांना कोणतीही त्रुटी आली नाही.
निवडणुकादरम्यान सर्वात कठीण प्रसंग होता भारताचे पंतप्रधान यांच्या दोन सभा. त्यामध्ये येणारी नागरीकांची गर्दी, अतिविशिष्ट व्यक्तीची सुरक्षा त्यामध्ये एसपीजीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत समन्वय राखण्याची कला मी या निवडणुकीत शिकलो. नांदेड जिल्ह्यात पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्या. त्या दोन्ही सभांमध्ये नियोजन करतांना मी केलेल्या कामाची दखल घेवून विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी मला लातूर येथे झालेल्या पंतप्रधानांच्या सभेची जबाबदारी सुध्दा दिली. हा माझ्या मेहनतीला मिळालेला रिवार्ड होता. लातूरला गेलो तेंव्हा मी नांदेडमध्ये केलेल्या दोन सभा आणि तेथे असलेली तयारी यामध्ये बरेच अंतर होेते. ते अंतर मी दुरुस्त करून घेतले आणि लातूरची पंतप्रधानाची सभा अत्यंत शांततेत पार पडली.नांदेडच्या दोन सभापेक्षा पंतप्रधानाच्या लातूरच्या सभेत जास्त गर्दी होती असा उल्लेख अबिनाशकुमार यांनी केला. या तिन सभांचा बंदोबस्त करतांना मी कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. या शब्दांवर विश्र्वास ठेवला आणि सहनशक्तीमध्ये वाढ करून घेतली हा सुध्दा मला शिकायला मिळालेला निवडणुकीतील धडा आहे.
नांदेड जिल्ह्यात अनेक प्रतिबंधात्मक कार्यवाही आम्ही केल्या. हा निवडणुकीपुर्वीचा प्रकार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान या त्रासदायक व्यक्तींची उपस्थिती राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये गोंधळ होवू शकतो ही शक्यता समाप्त झाली. हा माझ्या शिकवणुकीतील एक नवीन धडा आहे. कारण काही निवडक मंडळींच्या उपस्थितीमुळे निवडणुकीचे चित्र बदलू शकते. त्यामुळे निवडणुकीपुर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजना अत्यंत गरजेचे आहे हे मला शिकायला मिळाले. निवडणुकीत काम करतांना कोण माझे ऐकते, कोण ऐकत नाही यावर काम करण्यापेक्षा मी स्वत:चे ऐकत गेलो आणि माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि अंमलदारांकडून त्यानुसार काम करून घेत होतो. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. माझ्या प्रयत्नांना यश आले की, नाही हे मी ठरवू शकत नाही. परंतू प्रत्येक यशाला प्रयत्नच कारण असते हे मला नक्की माहित आहे आणि त्यानुसारच मी काम केले आहे.या कामाचा मला भविष्यातील निवडणुकांमध्ये नक्कीच फायदा होईल.
अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद निवडणुकीच्या संदर्भाने नांदेडला आले होते, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात मी माझ्या कनिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांकडून करवून घेतलेले काम मला भविष्याच्या निवडणुकीसाठी नक्कीच कामी येतील. पोलीस दल जे काही काम करते हे सर्व टिमवर्क आहे. त्यामुळे मी काही केले हा प्रश्नच उदभवत नाही आणि माझ्या जीवनात पोलीस सेवा करतांना ही पहिलीच लोकसभा निवडणुक होती त्यामुळे मी तर शिकाऊच होतो. 45 दिवसांची निवडणुक प्रक्रिया पार पाडतांना, त्यातील बारकावे पाहतांना आणि निवडणुक आयोगाचे आदेश अंमलात आणतांना माझा भारतीय निवडणुक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या निवडणुक प्रक्रियेवर ही निवडणुक प्रक्रिया मजबुत प्रणाली आहे असा विश्र्वास दृढ झाला असे अबिनाशकुमार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *